डेटिंगसाठी जाताना प्रत्येकजण मनात काही चांगले घेऊन जातो मात्र समोरील व्यक्तीच जर चुकीचा असेल तर ? असेच काहीसे मॅनचेस्टरमध्ये एका 36 वर्षाच्या महिलेसोबत घडले असून डेटिंगला म्हणून गेलेली ही महिला चक्क हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली आहे .
सदर महिलेची ओळख काही आठवड्यांपूर्वीच एका डेटिंग ऐपवर एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघांमध्ये चांगली ट्यूनिंग जमल्यानं त्यांनी डेटिंगचा प्लॅन केला आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ही महिला 17 सप्टेंबरला तयार होऊन डेटसाठी गेली. डिनरवर त्यांनी थोडं ड्रिंक घेतलं अन त्यानंतर मात्र या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आणि त्याने या महिलेला वाईट पद्धतीनं मारहाण केली आणि रात्रीच्या वेळी तिला रस्त्यावर सोडून फरार झाला.
महिला सध्या ऍडमिट असून तिच्या म्हणण्यानुसार , ‘ सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. आम्ही संध्याकाळी डिनर केले आणि आम्ही जेव्हा पार्किंगमध्ये गेलो तेव्हा या व्यक्तीची कार सापडत नव्हती. १५ मिनिटे कार शोधूनही न मिळाल्यानं तो चिडला आणि आमच्यात वाद सुरू झाला मात्र कार सापडली तेव्हा कारमध्ये मी बसताच हा व्यक्ती भडकला आणि त्याने मला मारहाण केली आणि तिला कारमधून बाहेर फेकलं त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या एका मित्राला बोलावलं आणि त्याने मला रुग्णालयात दाखल केले ‘