महाराष्ट्रात बोगस डॉक्टर यांना मुन्नाभाई म्हणण्याचा पॅटर्न रुजू झालेला आहे मात्र दुसरीकडे दुर्दैवाने आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीची डिग्री मिळवलेल्या डॉक्टरांना देखील अनेकदा भोंदू डॉक्टर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो अर्थात ग्रामीण भागात हा प्रकार अधिक प्रमाणात असून आता यापुढे अशा डॉक्टरांना भोंदू किंवा बोगस डॉक्टर म्हटले गेल्यास नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कायद्यानुसार हा गुन्हा ठरणार आहे. आयुष मंत्रालयाकडून यासंदर्भात संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आपल्याकडे पूर्वीपासून केवळ एमबीबीएस डॉक्टर अशी संकल्पना लोकांच्या मनात रुजलेली आहे इतर त्या तुलनेत इतर स्वरूपाचे शिक्षण म्हणजे दुय्यम दर्जाचे मानले जाते त्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन देखील आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टर यांच्या वाट्याला उपेक्षा आल्याचे दिसून येत आहे अर्थात काही अलोपॅथी डॉक्टरदेखील आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीच्या ट्रीटमेंटकडे उपेक्षेने पाहतात.
केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना करत ॲलोपॅथीप्रमाणे आयुर्वेदिक आणि युनानी यादेखील वैद्यकीय शाखा असल्याचे जाहीर केले असून त्यांच्यातील भेदभाव नष्ट केला आहे मात्र सामाजिक स्तरावर भेदभावाची मानसिकता अद्यापही असून आता मात्र या डॉक्टरांना भोंदू अथवा बोगस डॉक्टर म्हटल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.