शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 28 दिवसांनंतर त्याच्या घरी पोहचला. देशातील मीडियाने सतत जनतेला यामध्येच गुंतवून ठेवले तर दुसरीकडे या 28 दिवसांत पेट्रोल तब्बल 6.66 रुपयांनी वाढलं आहे. देशात महागाई देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत असून गोदी मीडियाकडून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी असे मुद्दे भडकावले जात आहेत आणि मुद्देच नसतील तर मुद्दाम मुद्दे बनवले जात आहेत.
आर्यन खान 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या अटकेत गेला त्यादिवशी मुंबईत पेट्रोलचे दर 108.15 रुपये प्रतिलिटर होते. तर डिझेल प्रति लिटर 98.12 रुपयांवर पोहोचले होते. ३० तारखेला मन्नत बंगल्यावर आर्यनचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आर्यन घरी परतला त्यादिवशी पेट्रोलचे दर 114.81 रुपये एवढे आहेत.
आर्यन तुरुंगात गेला त्यादिवशी 108.15 रुपये असलेला पेट्रोलचा दर ज्यादिवशी आर्यन तुरुंगातून बाहेर आला त्यादिवशी 114.81 रुपये म्हणजेच या 28 दिवसांत पेट्रोल 6.66 रुपयांनी वाढले आहे. पेट्रोल-डिझेलची दररोज 30 ते 35 पैशांपर्यंत वाढ होत असल्याने तब्बल 6 ते 7 रुपयांपर्यंत पेट्रोलचे भाव वाढल्याचेही आपल्या लक्षात आलं नाही. दुसरीकडे मोदी या मुद्द्यावर गप्प असून विदेश दौरे उरकत आहेत अर्थात त्या दौऱ्याचे फलित काय ? हा देखील जनतेला प्रश्न पडला आहे.