महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात विशेषतः: पुण्यात कायदा हातात घेण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे . अशीच एक घटना समोर आली असून पिंपरी चिंचवडमध्ये एका साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने चक्क जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जेवण पार्सल मिळण्यास विलंब होत असताना महिला लंचहोम चालक यांना आरोपी ग्राहक अर्वाच्य भाषेत बोलत होता त्यावरून त्याला सध्या वेशात असलेल्या पोलिसाने हटकले म्हणून त्याचा राग अनावर झाला .
पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर हे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचमध्ये कार्यरत आहेत. साध्या वेशात देहूरोड बाजार येथे गस्त घालत असताना आरोपी अरविंद ढिल्लोड हा बालाजी लंच हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घ्यायला आला होता. जेवण पार्सल मिळण्यास विलंब असल्याने तो महिला लंचहोम चालक यांना आरोपी ग्राहक अर्वाच्य भाषेत बोलत होता.
पोलीस ज्ञानेश्वर गाडेकर यांनी आरोपी अरविंद याला महिलेशी चांगल्या भाषेत बोल असे सांगताच आरोपी अरविंदने पोलिसांच्या कानशिलात लगावून दिली. साध्या वेशात असल्याने मारहाण करणाऱ्या आरोपीला समोरील व्यक्ती पोलीस आहे हे माहिती होते की नाही ? याची माहिती समोर आलेली नाही. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.