पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पिंपरी येथे उघडकीला आली असून हॉटेलमध्ये राहून गेलेल्या एका महिलेला हॉटेलच्या व्यवस्थापकांने व्हाट्सअपवर ‘ नको तो ‘ व्हिडिओ पाठवला. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अकरा तारखेला हा प्रकार घडलेला आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हॉटेल व्यवस्थापक चमोली ( राहणार हॉटेल त्रिकॉट कॅस्टल श्रीनगर गडवाल ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला या हॉटेल त्रिकॉट कॅस्टल येथे ऑगस्ट 2021 मध्ये राहण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी चमोली याने महिलेशी संपर्क साधून त्यांना आपला मोबाइल नंबरही दिला होता तसेच त्यांचा देखील मोबाईल नंबर त्याने मिळवला होता. या नंबरच्या व्हाट्सअपवर चमोली याने व्हिडिओ पाठवला असून सदर प्रकरणी सांगवी पोलिस तपास करत असल्याचे समजते.