देशात पेट्रोल-डिझेलच्या भावाने नवीन उच्चांक गाठलेला आहे तर गॅस सिलेंडर देखील एक हजारांच्या दरम्यान पोहोचलेले आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून गोदी मीडिया मात्र सुस्तावलेला पाहायला मिळत आहे . गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महागाईवरून केंद्र सरकारला उपरोधिक टोला लावताना ‘ अमेरिकेने हवेतून पोटे भरणारे मशीन शोधलेली असून ही मशीन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे यामुळे कितीही महागाई वाढली तरी काळजी करू नका ‘, असा खोचक टोला आव्हाड यांनी केंद्र सरकारला लावलेला आहे.
सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चाललेले आहेत. डिझेलचा दर देखील तब्बल शंभर रुपये तर पेट्रोल 120 रुपयांवर पोहोचलेले आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले आहेत. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून गेलेला असून अंबरनाथ येथे आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी बोलताना केंद्र सरकारला उपरोधिकपणे टोला लावलेला असून अमेरिकेत सध्या हवेतून पोट भरणारी मशिन विकसित करण्यात आलेली आहे लवकरच ही मशीन भारतात लॉन्च होणार आहेत त्यामुळे महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे ते तीनशे रुपये लिटर जरी झाले तरी त्याची काळजी करू नका. हवेतून पोट भरणारे मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा ‘ असे म्हटलेले आहे