नवाब मलिक यांना भाजप नेते मोहित कंबोज यांचेही जोरदार उत्तर , म्हणाले की ..

Spread the love

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला असल्याने अस्लम शेख आणि काशिफ खानचे काय संबंध आहेत हे उघड झालं. पाहिजे. अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद अनेक आरोप केले आहेत.

काय म्हणाले मोहित कंबोज ?

अस्लम शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. ओळख नसलेला माणूस एकदा आमंत्रित करेल मात्र ओळख असल्याशिवाय वारंवार कसे बोलावेल? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो? . अस्लम शेख यांचे कॉल रिकॉर्ड चेक केले पाहिजे.अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे. अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचाच आहे. मी फक्त कोण मंत्री यात आहे असं मी विचारलं होतं ? मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच ते नाव घेतलं.

अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना काशिफ खानने पार्टीत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. किती वेळा हे निमंत्रण दिलं? या मुलांसोबत काशिफची कुठे बैठक झाली? काशिफ खानचे आणि या नेत्यांच्या मुलांचे काय संबंध आहेत? याचीही चौकशी झाली पाहिजे. नवाब मलिक यांनीच ही माहिती उघड केल्याने आता सर्वच बाहेर येईल. राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत याची माहिती मलिक यांना द्यावी लागेल कारण मलिक यांची ही जबाबदारी आहे.

नवाब मलिक यांनी ज्या वरळी हॉटेलचं नाव घेतलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही. नवाब मलिक आता इतरांची संपत्तीही माझीच म्हणून दाखवत आहेत. त्यांनी माझ्यावर 1100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. मी निवडणूक लढवली त्यावेळी मी साडेतीनशे कोटीची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आणि त्याच प्रतिज्ञापत्रंही दिलं आहे मग मी कोणता फ्रॉड केला ते सांगा. हे खोटे आरोप आहेत. मी व्यापारी व्यक्ती आहे. मी वर्षाला पाच कोटीचा टॅक्स भरतो. माझे अनेक व्यवसाय आहे. मी काहीच लपवत नाही.

माझ्यावर आरोप करणारे नवाब मलिक यांची मुलं 47 लाखाची इन्कम दाखवून मोठमोठी प्रॉपर्टी घेत आहेत. या प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझा आवाज दाबला जात आहे. माझा आवाज दाबू शकतील, मला बसवू शकतील असं त्यांना वाटतं. मला घाबरवू असं त्यांना वाटतं. पण मी त्यांना घाबरत नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कोणतीही केस करा. मी घाबरणार नाही. गेल्या पाच वर्षात हॉटेल ललितला गेलो नाही. सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. मी पुरावे घेऊन बोलतो. हवेत बोलत नाही.


Spread the love