येरवडा कारागृहात एक कैदी कमी भरताच प्रशासनाची धावपळ झाली अन ..

Spread the love

पुणे येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून पुणे येरवडा कारागृह इथे पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आणि आरोपी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सचिन मधुकर नरवाडे ( वय 31 राहणार बजरंग वाडी शिक्रापूर मूळ राहणार जिल्हा जालना ) असे त्याचे नाव आहे.दोन जून रोजी सचिन याने रागाच्या भरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केला होता त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती.

सात तारखेला दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयीन कोठडीतील काही काळापुरते मोकळे सोडण्यात आले होते त्यावेळी कैद्यांमध्ये एक कैदी कमी आढळून आल्याने तपास सुरू केला त्यावेळी सचिन याने बराक क्रमांक दोनच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येसाठी चादर त्याने मिळवली आणि तिच्या आधाराने त्याने गळफास घेतला असे येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक घाटे यांनी सांगितले आहे.


Spread the love