महाराष्ट्र हादरला..दारूच्या नशेत बापाची नियत फिरली अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना भिवंडी येथे उघडकीला आलेली असून दारूच्या नशेत असलेल्या एका नराधम बापाने स्वतःच्या दहा वर्षे मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. भिवंडी शहर पोलिसांनी या बापाला बेड्या ठोकलेल्या असून ठाणे न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत मुलगी ही इयत्ता सहावीत शिकत असून आई-वडिलांच्या सोबत राहत होती. तिच्या बापाला दारूचे व्यसन असल्याने काहीही काम करत नव्हता आणि दिवसभर घरीच बसून राहायचा. मुलीची आई एका गोदामात कामाला जाऊन कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. गुरुवारी मुलीची आई कामाला गेली असताना घरी मुलगी आणि बाबा असे दोघेच होते.

संध्याकाळी आठ वाजता मुलीची आई घरी आली त्यावेळी दरवाज्याला कडी लावलेली होती. तिने कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला असता तिची मुलगी निपचित पडलेली होती. आईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती जागी झाली नाही नाही म्हणून आईने ओरडाओरडा केला आणि मुलीला दवाखान्यात दाखल केले मात्र तिथे ती मयत असल्याचे घोषित करण्यात आले. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही तासात मुलीच्या वडिलांना बेड्या ठोकल्या.


Spread the love