विचित्रच..चक्क हनिमूनच्या रात्री वधूची आई देखील त्याच बेडवर , कुठे आहे प्रकार ?

हनीमूनबाबत प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मात्र एक अशी प्रथा जी वाचली कि आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक प्रथा आफ्रिका इथे असून लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच हनीमूनला वधूची आई ही कपलसोबत बेडरूममध्ये झोपते. उडीसा पोस्ट नावाच्या बेवसाईटने दिलेल्या बातमीनुसार या प्रथेमागे नवरा आणि बायकोला देण्यात येणारं हे एक प्रकारचं सेक्स एज्युकेशन असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आई वधू आणि वराला मार्गदर्शन करते आणि हनीमून कसा साजरा करावा, याबद्दल तिचा अनुभव या जोडप्यासोबत शेअर करते . जर वधूला आई नसेल तर घऱातील एखादी ज्येष्ठ महिला ही जबाबदारी घेते आणि पूर्ण रात्र त्या जोडप्यासोबत त्यांच्या रूममध्ये झोपते. दुसऱ्या दिवशी त्या जोडप्याचं कामजीवन योग्य प्रकारे सुरू झालं की नाही, याची इत्यंभूत माहिती ही महिला इतर नातेवाईकांना देते आणि त्यानंतर ‘ रात्रीची गोष्ट ‘ सगळीकडे शेअर केली जाते आणि सेलिब्रेशन केले जाते.

भारतात मात्र हनिमून ही चिडवणे आणि मस्करी करणे इथपर्यंतच इतर व्यक्तींचा सहभाग असतो मात्र हनीमून हा दोघांचा अत्यंत खासगी मामला मानला जातो. हनीमून ही लग्न झालेल्या जोडप्याला एकांत मिळण्यासाठीची प्रक्रिया मानली जाते आणि दोघांना एकांतात सोडलं जातं. अफ्रिकेत मात्र याच्या नेमकी उलटी पद्धत काही गावात आहे.

Share