देशात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथे शिक्षक असलेल्या एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे सदर शिक्षक हा सरकारी शाळेतील कर्मचारी असून झोकांड्या खात तो शाळेमध्ये पोहोचलेला होता . शाळेत आल्यानंतर त्याचे स्वतःवर नियंत्रण नव्हते. आपले शिक्षक अशा अवस्थेत पाहून मुले देखील घाबरून गेली त्यानंतर या शिक्षकाचे निलंबन करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जबलपूरच्या ग्रामीण भागातील जमूनया शाळेतील हा प्रकार असून शिक्षक इतक्यामध्ये धुंद अवस्थेत आलेला होता की त्याला काहीही समजत नव्हते अथवा नीट चालता देखील येत नव्हते . त्याची ही अवस्था पाहून शाळेतील मुले घाबरून गेली मात्र त्यातील काही चलाख मुलांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल करून दिला.
राजेंद्र नेताम असे या शिक्षकाचे नाव असून तो गेल्या बऱ्याच दिवसांपासून या शाळेत शिकवत असायचा . दारूच्या नशेत तो याआधी देखील शाळेत आलेला आहे मात्र त्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर पण पालकांमध्ये देखील संतापाची लाट आहे . दारूच्या नशेत इतरही काही गैरप्रकार त्याच्याकडून होण्याची शक्यता पालकांनी वर्तविली असून त्यानंतर त्याचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे .