देशात सध्या अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र असून यामध्ये सध्या मॅरेज रॅकेट नावाच्या गुन्हेगारीचा समावेश झालेला आहे. देशभरात फसवून लग्न करून देणाऱ्या व्यक्तींची टोळी कार्यरत असून असाच एक प्रकार राजस्थानमधून बिहार येथे आलेल्या एका तरुणासोबत घडलेला आहे.
राजस्थानच्या रायपूर येथे एका व्यक्तीने दलाल असलेल्या एका व्यक्तीच्या माध्यमातून विवाह ठरवलेला होता. लग्नासाठी हा तरुण तब्बल सोळाशे किलोमीटर वरून तिथे आला मात्र लग्नाआधी नवरीने त्याला साठ हजार रुपये मागितले. तरुण लग्नासाठी आला त्यावेळी मुलीची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून मंदिरातच लग्न लावून देणार आहोत असे त्याला सांगण्यात आले त्यावर त्याने विश्वास ठेवला
मुलीने बोहल्यावर उभे राहण्याआधी त्याच्याकडे 60 हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने हे पैसे तरुणीच्या हातात दिले आणि त्यानंतर काहीतरी कारण सांगून नवरी आणि तिच्यासोबत आलेले इतर व्यक्ती अचानकपणे मंदिरातून गायब झाले . काही कालावधीत ते परत येतील असे नवरदेव मंदिरात बसून थांबला मात्र ते आलेच नाही त्यावेळी त्याला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्याने पोलिसात धाव घेतली.