गुजरात मॉडेल…परीक्षा येताच प्रियकर प्रेयसीचा ‘ मास्टरप्लॅन ‘

Spread the love

सध्या नागरीक कधी काय करतील याचा काही भरवसा राहिलेला नाही. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून गुजरातमध्ये एका प्रियकराच्या जागी चक्क 24 वर्षीय प्रेयसी परीक्षा देताना आढळून आलेली आहे. सुरत मधील विर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात बीकॉमच्या तृतीय वर्षाची परीक्षा देताना ही मुलगी पकडले गेलेली असून एडमिट कार्डवरील फोटो एडिट करून नावात थोडा बदल तिने केलेला होता मात्र हा प्रकार पथकाच्या लक्षात आला त्यावेळी तिचा प्रियकर हा उत्तराखंड येथे फिरायला गेलेला असल्याचे लक्षात आले.

ऑक्टोबर मधील हे प्रकरण असून शिक्षा म्हणून या तरुणीची असलेली बीकॉमची असलेली पदवी रद्द करण्याची शिफारस आता विद्यापीठाकडे करण्यात आलेली आहे. तिचा प्रियकर हा सातत्याने नापास होत होता त्यामुळे गुजराती नावे ही महिला आणि पुरुषांची अनेकदा समान असतात त्याचा फायदा घेत या तरुणीने आपल्या प्रियकराला पास करण्यासाठी ती त्याच्या जागी बसली. दोघेही एकाच कॉलेजचे असून सदर विद्यार्थिनी ही आता एक सरकारी नोकरी करत आहे.

विद्यापीठाने हा प्रकार गांभीर्याने घेतलेला असून तिची सरकारी नोकरी जाण्याची चिन्हे आहेत. मूळ विद्यार्थ्याचे देखील मागील सर्व निकाल अवैध ठरवून पुढील तीन वर्ष त्याला परीक्षेला न बसण्याची देखील शिक्षा होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रियकराला परीक्षेत पास करण्यासाठी या तरुणीने जे काही केले त्याविषयी आता सोशल मिडीयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत


Spread the love