काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एकाच टॉयलेटमध्ये दोन टॉयलेट सीट बसवण्याचे प्रकरण समोर आले होते. एकाच टॉयलेटच्या रूममध्ये दोन टॉयलेट सीट असल्यानंतर याचा वापर कोणी आणि कसा करायचा यावर देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती हे प्रकरण चर्चेत असतानाच आणखीन एक प्रकरण समोर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनचे या महाभागांनी बारा वाजलेले आहेत. सदर स्वच्छतागृहात केवळ चार भांडी बसविण्यात आलेले आहेत मात्र भिंतीसाठीचे पार्टिशन केलेले नाही.
उत्तर प्रदेशातील धनसा गावात हा प्रकार समोर आलेला असून गावात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले त्यावेळी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रशासनाच्या कामावर सोशल मीडियातून जोरदार टीका केली जात असून योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात हे काय चाललंय ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका टॉयलेटमध्ये तब्बल 4 टॉयलेट सीट बसवण्यात आलेले आहे मात्र भिंतीसाठी पार्टिशनच केलेले नाही.
एका जागरूक नागरिकाने हा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर अधिकाऱ्यांची देखील चांगलीच झोप उडाली असून मुख्य विकास अधिकारी राजेश प्रजापती यांनी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. सरकारी कामाच्या दर्जावर होऊन अनेक वेळा प्रशासनाला धारेवर धरलं जातं मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर असून दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.