काही दिवसांपूर्वी हिंगोली येथे तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकरण चांगलेच चर्चेत आलेले होते. सदर व्यक्तीने एका शिक्षण संस्थेत गेले अनेक दिवस पाहुणचार झोडला आणि त्यानंतर या व्यक्तीला चक्क स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आले आणि हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्याची अधिक माहिती जमा केली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार, अमोल मराठे उर्फ पजई असे आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत इतर दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. सदर व्यक्तीने आतापर्यंत अनेक जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा असून या व्यक्तीच्या गाडी पाच लाख रुपये व काही बनावट कागदपत्रे आढळून आलेली होती .सदर प्रकरणात आत्ता पोलिसांनी अमोल मराठे यांच्या पत्नीलाही अटक केलेली असून तिच्याकडून आर्थिक देवाण-घेवाण संदर्भात बरीच माहिती हाती लागण्याची आशा आहे. हिंगोली शहर पोलीस निरीक्षक एस एस आमले याप्रकरणी तपास करत आहे .
अमोल वासुदेव पजई ( वय 30 ) असे मुख्य आरोपीचे नाव असून अनंता मधुकर कलोरे ( वय 42 राहणार मोठी उमरी अकोला ) , संदीप उर्फ इंद्रजीत एकनाथ पाचमासे ( वय 34 राहणार सुराणा नगर हिंगोली ) यांच्या मदतीने तो परिसरातील एका शाळेत दाखल झालेला होता. तिथे आल्यानंतर त्याने आपल्या आपण अधिकारी असल्याचे भासवत या शाळेत दोन मुलांचे ऍडमिशन देखील करून दिले. मोठा अधिकारी आपल्याकडे आलेला आहे म्हणून या संस्थेने देखील वार्षिक स्नेहसंमेलनात त्याचे नाव छापून त्यांना प्रमुख पाहुणा बनवलेले होते.
सदर प्रकार शाळेच्या आधी लक्षात आला नाही मात्र हा अधिकारी स्नेहसंमेलनात तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटला त्यावेळी त्याने आपण आयएएस असल्याची देखील बतावणी केली. आपण अतिरिक्त जिल्हाधिकारी असून हिंगोलीत बदलीवर येणार आहोत असे सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी त्याची माहिती काढली असता हा सर्व प्रकार बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली.