पाण्याच्या तक्रारीसाठी नागरिकांना आता 24 तास पुणे महापालिकेकडे तक्रार नोंदविता येणार असून एक हेल्पलाईन नंबर 1 मार्चपासून सुरु करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात माहिती दिली आहे की, पुणे शहरातील पाणी पुरवठा विषयक तक्रारी करीता 24 तास हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात येणार आहे. ज्यामध्ये नागरिक परिसरात पाणी न येणे, कमी दाबाने पाणी येणे, जलवाहिनी फुटणे अशा तक्रारी करु शकतात.
त्यासाठी नागरिकांना 02025501383 या क्रमांकावर फोन करून तक्रार सांगता येणार आहे. हा क्रमांक 1 मार्च पासून सुरु करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.