लोहेगावमधील ‘ त्या ‘ भांडणात अखेर सुनेने गमावले प्राण

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना लोहगाव परिसरात समोर आलेली असून घरकाम जमत नसल्याचा आरोप करत एका सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटले त्यामध्ये सुनेचा मृत्यू झालेला असून विमानतळ पोलिसांनी आरोपी सासूला तात्काळ अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रितू रवींद्र माळवी ( वय 28 राहणार कलवड वस्ती लोहगाव ) असे मयत महिलेचे नाव असून त्यांचे सासू असलेली कमला प्रभूलाल माळवी ( वय 49 ) हिला तात्काळ पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रितू हिला घरकाम जमत नाही तसेच नातवाला देखील ती व्यवस्थित सांभाळत नाही यावरून सासू तिचा छळ करत होती आणि घरात तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही म्हणून सासूने तिचा छळ सुरू केलेला होता. दोन दिवसांपूर्वी फ्रिज उघडत असताना सासूचा पाय रितूला लागल्यानंतर वाद सुरू झालेला होता . रितू आणि सासू यांच्यात भांडणे झाली त्यावेळी सासू कमला हिने रितूला मारहाण केली आणि तिचे डोके फरशीवर आपटले.

रितू गंभीर जखमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालेला असून तिच्या डोक्याला दुखापत आणि मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर सासू कमला हिची चौकशी करण्यात आली यावेळी तिने आपण सुनेला बेदम मारहाण केली त्यात त्यामुळे ती जखमी झाली होती असे सांगितले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Spread the love