‘ ह्या ‘ फोटोमागचे सत्य जाणून घेतले तर तुम्हीही म्हणालं की , ‘ महाराष्ट्र पोलीस..’

सोशल मीडियावर सध्या मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या म्हात्रे नावाच्या महिलेचे जोरदार कौतुक केले जात आहे. एका सुनेने तिच्या ७२ वर्षीय सासूला मारहाण केलेली होती त्यानंतर खार पोलिसांनी सुनेला अटक केली मात्र मारहाण केल्यानंतर बहात्तर वर्षीय सासूला चक्क हातावर उचलत या महिला पोलीस शिपाई यांनी चौथ्या मजल्यावरून खाली आणले आणि त्यानंतर 100 मीटर कडेवर उचलून रस्त्यापर्यंत आणले आणि अखेर रिक्षात बसवत दवाखान्यात दाखल केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वेणुबाई वाते असे 72 वर्षीय सासूंचे नाव असून त्या मुंबईतील खारदांडा पश्चिम येथे राहतात. किरकोळ वादातून त्यांच्या सुनेने त्यांना मारहाण केली आणि पोलीस कंट्रोल रूमला या संदर्भात माहिती मिळाली. पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक घोगरे, महिला पोलीस शिपाई म्हात्रे यांनी या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी वृद्ध महिलेला कुठलीही हालचाल करता येत नव्हती.

कुठल्याही क्षणी काही अघटित होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर पोलीस शिपाई असलेल्या म्हात्रे यांनी कसलाही विचार न करता अक्षरश: या महिलेला हातावर लहान बाळाप्रमाणे चौथ्या मजल्यावरून खाली आणलं आणि तिथून १०० मीटर रस्त्यावर उचलत अखेर भाभा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. खार पोलीस ठाण्यात या आरोपी सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घटना घडली त्यावेळी घरात कोणीही पुरुष व्यक्ती नसल्याने सुनेने सासूवर हात उचलत त्यांना बेदम मारहाण केलेली होती. सुनेच्या विरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिला अटक करण्यात आली तर वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे ७२ वर्षीय सासू यांची प्रकृती देखील सुधारत असल्याची माहिती आहे .