अन ‘ त्या ‘ 48 जणांची पिंपरी पोलिसांनी उतरवली झाक

होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असल्याने अनेकजण रंग खेळण्यावेळी मद्यप्राशन करतात. पोलिसांनी याआधी देखील मद्यप्राशन करून वाहन चालवले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलेला होता मात्र त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मद्यप्राशन करून झिंगाट झालेल्या 48 वाहन चालकांची झाक पिंपरी पोलिसांनी उतरवलेली आहे.

सात तारखेला धुलीवंदन असल्याकारणाने पोलिसांनी देखील काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून चांगलाच बंदोबस्त लावलेला होता यादरम्यान मोहीम राबवली त्यावेळी तब्बल 48 वाहन चालक झिंगाट झालेले दिसून आलेले होते. त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह कायद्याअंतर्गत न्यायालयात आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून अपघात टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी दाखवलेल्या सक्रियतेचे नागरिक कौतुक करत आहेत.