भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेणारी करमणूक क्षेत्रातील सेलिब्रिटी उर्फी जावेद हिच्या बाबतीत एक खळबळजनक दावा आलेला असून एका व्यक्तीने उर्फी जावेद ही चक्क तृतीयपंथी असल्याचे म्हटलेले आहे. आपल्याकडे तशा स्वरूपाचे पुरावे देखील आहेत असेही त्याने म्हटलेले असून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
अभिनेता फैजान अन्सारी याने उर्फी जावेद हिच्यावर टीका केलेली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. उर्फी जावेद ही तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनने चर्चेत आलेली असून चित्रा वाघ यांचा तिने चक्क ‘ चित्रू ‘ असा उल्लेख केलेला होता. तिचे बोल्ड फोटो रोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिच्या फोटोला अनेक प्रतिक्रिया रोज येत असतात.
फैजान अन्सारी याने दावा केला आहे की उर्फी जावेद ही मुलगी नसून तृतीयपंथी आहे. मी जे काही बोलत आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ पडली तर सगळ्या गोष्टी मी कोर्टामध्ये सिद्ध करेल असे त्याने म्हटलेले असून त्याने उर्फी जावेद हिच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे आणि आपण लवकरच सर्व जणांना हे सांगू असे देखील त्याने म्हटलेले आहे .