सत्तेत आल्यानंतर भाजपच्या नेत्यांचा सत्तेचा उन्माद काही लपून राहिलेला नाही. विशेष म्हणजे यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचे देखील लक्षनीय प्रमाण असून सर्वसामान्य नागरिकांशी बोलताना मुद्दामपनाची भाषा तसेच शिवराळ भाषा महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून वापरण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून हा व्हिडिओ पुण्यातील पिंपळगाव बसवंत येथील असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक भाजपची महिला कार्यकर्ती टोल कर्मचाऱ्याला दमदाटी करताना दिसत असून त्यामध्ये त्यांनी अक्षरशः भाषेची पातळी पूर्णपणे ओलांडलेली आहे. टोलवरील कर्मचाऱ्याला आईमाईवर तसेच त्याच्या जन्माविषयी देखील अत्यंत अश्लील भाषेत या महिला कार्यकर्तीने टीका केलेली आहे. पार्टी विविध डिफरन्स असा नारा घेऊन आपण सुसंस्कृत आणि भारतीय संस्कृतीचे पालन करणारे संस्कृतीचे रक्षक आहोत असा एकतर्फी दावा प्रचार करणाऱ्या भाजपच्या या महिला कार्यकर्तीला अशी भाषा शोभते का ? यावरून सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.
टोलवरील कर्मचारी यांनी या महिला पदाधिकाऱ्याला 140 रुपयाचा टोल मागितला होता त्यावरून त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत या व्यक्तीला शिवीगाळ सुरू केली त्यानंतर मी आत्ताच्या आत्ता इथे रूपालीताई चाकणकर आणि रूपालीताई ठोंबरे यांना बोलावून घेण्याची धमक माझ्यात आहे अशी देखील धमकी त्या या कर्मचाऱ्याला देत होत्या . सदर कर्मचारी त्यांचा हा व्हिडिओ काढत असताना ,’ काढ तुला काय व्हिडिओ काढायचा आहे ‘ असा देखील असा देखील उद्दामपणा त्यांनी या कर्मचाऱ्यांसोबत केलेला असून त्यांच्या या कृतीवर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे .
‘ तू काय सोडतो मला.. त्याचा बाप सोडेल मला त्याचा ल* सोडेल मला .. तुझ्या बापाने ज्याला झ* काढला त्याची रेकॉर्डिंग काढ ‘ अशी देखील धमकी त्या या व्हिडिओमध्ये देत असून आहेत व्हिडिओमधील भाषा ही अत्यंत अर्वाच्च असून सदर व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे.