‘ तुझ्या बायकोला माझ्याकडं पाठव ‘ , विवाहितेच्या पतीनं रस्त्यात कायमचाच झोपवला

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना बंगळूरू येथे समोर आलेली असून एका 43 वर्षीय व्यक्तीच्या खुनाचे रहस्य अखेर उलगडण्यात पोलिसांना यश आलेले आहे. शेजारील व्यक्तीने त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आलेला असून मयत व्यक्तीने शेजारच्या व्यक्तीला तुझ्या बायकोला झोपण्यासाठी माझ्याकडे घरी पाठव अशी मागणी केली त्यानंतर संतप्त झालेल्या या तरुणाने त्याचा खून केलेला आहे.

बंगळूरूतील जयानगर परिसरात ही घटना समोर आलेली असून सिद्धपुरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. के एल कॉलनीतील हा प्रकार असून 45 वर्षीय सुरेश असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या शेजारी मनिकांत नावाचा इसम राहत होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर मनिकांत याने सुरेश याला ‘ तुझ्या पत्नीला माझ्याकडे झोपायला पाठव ‘ असे म्हटला त्यावरून सुरेश याला राग आला आणि त्याने मनीकांत याचा अमानुषपणे खून केला.

दोघेही व्यक्ती हे रोजंदारीवर काम करणारे असून आठ मार्च रोजी सकाळी आरोपी सुरेश मनीकांत यांच्या घरी आलेला होता. माझ्या घराजवळ झोपलेल्या तुमच्या मुलाला घरी घेऊन या असे त्याने मनीकांत याच्या आईला सांगितले त्यानंतर मनीकांत याची बायको बहिणीसोबत आली मात्र जेव्हा मनीकांतच्या बहिणीने पाहिले त्यावेळी भावाच्या नाकातून रक्त येत होते. तात्काळ मनीकांत याला शहरातील व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

मनीकांत याचा मृत्यू अंतर्गत जखमांमुळे झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले तेव्हा सुरेश हा मनिकांत याचा मृतदेह रस्त्यावर ओढत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सात मार्च रोजी मद्यधुंद अवस्थेत मनीकांत आपल्या घरी आलेला होता आणि त्याने आपल्या बायकोला ‘ माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवायला माझ्या घरी चल ‘ असे म्हटला म्हणून आपण त्याचा खून केला याची कबुली दिलेली असून मनिकांत हा रस्त्यात झोपलेला आहे असे भासवण्यासाठी त्याला आपण रस्त्यावर फेकून दिलेले होते असे देखील त्याने म्हटलेले आहे.


Spread the love