एकतर्फी प्रेमातून तिच्या सोसायटीत रात्री दीडला आला अन .., वाघोलीतील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सध्या पुण्यात वाघोली इथे समोर आली असून एकतर्फी प्रेमातून मुलगी बोलत नसल्या कारणाने वाघोली एका व्यक्तीने ती राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकी गाड्या पेटवून दिलेले आहेत. खांदवे नगर परिसरात 24 तारखेला रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडलेली असून विमानतळ पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेले आहे. तो आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीराम घाडगे ( राहणार वाघोली पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार अद्यापपर्यंत फरार आहे. तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी विमान नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची मुलगी आणि आरोपी श्रीराम हे विमाननगर परिसरातील एका कॉलेजमध्ये शिकत आहेत. एकतर्फी प्रेमातून श्रीराम याने या तरुणीला माझ्यासोबत बोलत जा म्हणून तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती . सदर बाब मुलीने वडिलांना सांगितली त्यानंतर त्यांनी श्रीराम घाडगे याला तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही तू उगाच त्रास देऊ नको असे समजावलेले होते.

तरुणीच्या वडिलांनी समजावल्याचा राग मनात धरत श्रीराम याने एका साथीदाराला सोबत घेतले आणि सोमवारी मध्यरात्री तक्रारदार यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी गाड्यांना आग लावली त्यामध्ये त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन गाड्या देखील यामध्ये जळून गेल्या. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.


Spread the love