त्याला वाटलं मयत आहे , कारमध्ये घेऊन फिरत होता पण अचानक…

Spread the love

देशात एक खळबळजनक अशी घटना दिल्लीत समोर आलेली असून एका तरुणाने प्रेमिकेची हत्या करण्यासाठी तिला कारमध्ये बोलावले आणि त्यानंतर तिच्यावर हातोडीने हल्ला केला. ती मयत झाली असे समजून तो मृतदेहाची वाट लावण्यासाठी कार घेऊन रस्त्यावर फिरत होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

सदर तरुणीला कारमध्ये बोलावल्यानंतर आरोपीने तिच्यावर हातोड्याने हल्ला केला आणि तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला त्यानंतर हा तरुण तिला घेऊन रस्त्यावर फिरू लागला त्यावेळी तो अत्यंत घाबरलेला होता. गडबडीमध्ये त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीला टक्कर मारली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली.

पोलीस तपासात आरोपी आणि पीडित तरुणी हे एकत्र राहत होते मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे राहायला सुरू केले. आरोपीने महिलेला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिच्यावर हातोड्याने हल्ला केला त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झालेली होती. आरोपीचे नाव साहिल कुमार असून तो दिल्ली जल बोर्डाचा कंत्राटी कर्मचारी आहे. पश्चिम दिल्ली येथील टिळकनगर मध्ये तो एका महिलेसोबत राहत होता मात्र त्यांच्यात भांडण झाले म्हणून त्याने बदला घेण्यासाठी हा प्रकार केला आहे .

30 जून रोजी आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि कारमध्ये तिच्यावर हल्ला केला त्यामध्ये ती बेशुद्ध झाली. ती मयत झालेली आहे असा आरोपीचा समज झाला आणि त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कार घेऊन तो फिरू लागला मात्र घाबरलेला असल्याकारणाने द्वारका सेक्टर तीनमधील हॉटेल बाहेर उभे असलेल्या कारला त्याने धडक दिली. काही अंतर गेल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले त्यावेळी ही तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत होती पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलेले असून तिची प्रकृती आता सुधारत आहे.


Spread the love