हिंदुराष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईला न्यायालयाचा दणका , शेतकऱ्याला मारहाण प्रकरण

Spread the love

पुणे जिल्ह्यात मुळशीतील जमीन बळकवण्यासाठी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळून लावलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मुळशी तालुक्यातील दारवली गावातील शेतकरी असलेले प्रदीप शिवाजी बलकवडे ( वय 35 ) यांची जमीन बळकावण्यासाठी धनंजय देसाई आणि त्याच्या साथीदारांनी एक ऑगस्ट रोजी त्यांना बेदम मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला त्यानंतर जामीन मिळावा म्हणून धनंजय देसाई हा न्यायालयात पोहोचलेला होता.

सरकारी वकील असलेले एडवोकेट विलास घोगरे पाटील , तक्रारदार व्यक्ती यांचे वकील एडवोकेट अमेय बलकवडे , एडवोकेट सतीश कांबळे , एडवोकेट सुरज शिंदे, एडवोकेट ऋषिकेश कडू या सर्वांनी धनंजय देसाई याच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. धनंजय देसाई याच्याविरोधात आत्तापर्यंत पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील त्याच्या फरारी साथीदारांचा देखील शोध घेणे बाकी आहे असे देखील वकिलांनी न्यायालयासमोर मांडले त्यानंतर धनंजय देसाई याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.


Spread the love