महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या कोल्हापूर इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्यानंतर मिटवामिटवी झाल्यावर पुन्हा घरी जात असताना वनकर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून कोल्हापुरातील वारे वसाहत इथे खून करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , भास्कर शंकर कांबळे ( वय पन्नास राहणार आणाजे तालुका राधानगरी ) असे मयत वन कर्मचाऱ्यांचे नाव असून याप्रकरणी संशयित असलेला आरोपी युवराज बळवंत कांबळे ( वय 27 राहणार कुडुत्री तालुका राधानगरी ) हा त्यानंतर स्वतःहून पोलिसात हजर झालेला होता. दोघेही राधानगरी तालुक्यातील रहिवासी असून कोल्हापूर शहरातील वारे वसाहत इथे भाड्याने राहत होते याच ठिकाणी बुधवारी रात्री ही घटना घडलेली आहे.
मयत भास्कर कांबळे आणि संशयित आरोपी युवराज कांबळे हे दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघेही वारे वसाहतीत राहत असल्याकारणाने त्यांची ओळखही होती आणि एकमेकांच्या घरी जाणे देखील जाणे येणे होते. भास्कर याला आपल्या पत्नीसोबत युवराज याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात निर्माण झालेला होता त्यातून त्यांच्यात वाद देखील झालेले होते मात्र अखेर त्यानंतर त्यांच्यातील वाद मिटले देखील होते.
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भास्कर याच्या डोक्यात घर करून होता त्यामुळे त्याने युवराज याला तुला सोडणार नाही अशी धमकी दिलेली होती त्यानंतर पुन्हा एकदा वाद झाला आणि तो वाद मिटवण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दोघेही संभाजीनगर येथील एका मित्राच्या घरी आलेले होते. वाद मिटवून घरी जात असताना वारे वसाहतीतील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर युवराज याने भास्करच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले.
हत्या केल्यानंतर आरोपी पुन्हा स्वतःहून पोलिसात हजर झाला आणि मी त्याला मारलं नसतं तर त्याने मला मारलं असतं असे सांगितले असून भास्करची पत्नी आणि युवराज यांची ओळख फेसबुकवरून झालेली होती. दोघेही जवळच्या गावात राहत असल्याकारणाने त्यांच्यातील मैत्री वाढलेली होती यामुळे पन्नास वर्षीय भास्कर यांच्या मनात संशय उत्पन्न झाला आणि त्यातून हा प्रकार घडला .