ऑनर किलिंगमध्ये महिलेने गमावले प्राण , मदत करणारा थोडक्यात बचावला

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात फरदापुर पासून जवळ असलेल्या अजिंठा रांगेत असलेल्या राक्षा शिवारात समोर आलेली असून ऑनर किलिंगच्या या प्रकारात एका महिलेने अखेर प्राण गमावलेले आहेत. फरदापुर पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चंद्रकला धोंडीबा बावस्कर ( वय 35 वर्ष राहणार तोंडापूर तालुका जामनेर ) असे महिलेचे नाव असून आरोपीमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोंडीबा बावस्कर , शिवाजी धोंडीबा बावस्कर , वडील धोंडीबा सांडू बावस्कर आणि शेवंताबाई धोंडीबा बावस्कर यांचा समावेश आहे.

चंद्रकला हिचे प्रेमसंबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता त्यातून घरात याआधी देखील वाद झालेले होते. शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह ( वय 30 वर्ष ) हा शेतात काम करत असताना तिथे चंद्रकला बावस्कर धावत आल्या आणि त्यांनी आई-वडील माझा खून करणार आहेत मला वाचवा अशी विनंती केली त्यानंतर शमीम याने त्यांना बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

काही सेकंदात आरोपी भाऊ तिथे पोहोचले आणि त्यांनी चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरू केली. आरोपींच्या हातात यावेळी कुऱ्हाड होती त्यानंतर त्यांनी चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. काही मिनिटात चंद्रकला यांचे आई वडील देखील तिथे आले आणि त्यांनी देखील चंद्रकला जखमी असताना त्यांना मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला. शमीम यास देखील आरोपींने मारहाण सुरु केल्यावर तो तिथून पळून गेला आणि पोलीस ठाण्यात पोहोचला. चारही आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.


Spread the love