‘ मी महाजन यांची बायको बोलतेय ‘ , बालाजीने लढवली अशी शक्कल की..

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे समोर आलेला असून वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एक रूम भाड्याने घेतली आणि या रूममध्ये एका महिलेवर तब्बल दोन महिने अत्याचार करत राहिला. पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर एका व्यक्तीच्या विरोधात 12 सप्टेंबर रोजी बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिलेचा विवाह 2000 साली झाल्यानंतर पती तिला त्रास देऊ लागला म्हणून ती माहेरी राहत होती. 2009 साली नोकरीनिमित्त ती पुण्याला गेली आणि एका डॉट कॉम वेबसाईटवरून तिची बालाजी महाजन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झालेली होती. आपण लग्न करू असे आमिष दाखवत बालाजी याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि बार्शी इथे एक रूम भाड्याने घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार करायला सुरू केले.

आरोपी मनमानी पद्धतीने यायचा आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून निघून जायचा. आपण अविवाहित आहोत असे त्याने सांगितलेले होते. एके दिवशी सहज तक्रारदार महिलेने त्याच्या फोनवर फोन केला त्यावेळी ‘ मी महाजन यांची बायको बोलतेय ‘ असे समजल्यानंतर महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. पीडित महिलेने तिच्यासोबत आणखी बोलणे केले तेव्हा ‘ बालाजी याने माझी बायको दहा वर्षापासून माझ्याकडे नांदत नाही ‘, असे सांगितले होते ही देखील माहिती समोर आली.

पीडित महिलेने त्यानंतर आरोपीच्या बायकोसोबत आणखी बोलणे केले त्यावेळी त्याने तिने आरोपीने ‘ मला दोन महिन्यांपासून तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगितलेले होते ‘ म्हणून बार्शीमध्ये त्याने एक रूम देखील घेऊन दिलेली होती. 3 सप्टेंबरपर्यंत त्याची वाट पाहिली मात्र तो आला नाही त्यानंतर घरमालकाने रूम खाली करण्यास सांगितले आणि तक्रारदार महिला ही सर्व साहित्य घेऊन माहेरी निघून गेली त्यानंतर तिने आरोपी बालाजी महाजन याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


Spread the love