पुण्यातून जाताच अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म , आरोपी इतका जवळचा की..

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना हिंगोलीत समोर आलेली असून स्वतःच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांनी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात समोर आलेला आहे. मुलीची प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला असून याप्रकरणी नराधम बापाच्या विरोधात 11 सप्टेंबर रोजी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , हिंगोली तालुक्यातील एक कुटुंब पुणे जिल्ह्यात काही कामानिमित्त गेलेले होते त्यावेळी 21 डिसेंबर 2022 रोजी आरोपी बापाने अल्पवयीन मुलीला झोपेतून उठवले आणि तिच्यावर अत्याचार केला. झाला प्रकार कुणाला सांगितला तर तिला जिवे मारण्याची देखील धमकी या बापाने दिलेली होती. सातत्याने हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली त्यावेळी मुलीच्या आईने बापाला जाब विचारला त्यावेळी त्याने तिला देखील जीवे मारण्याची धमकी दिली.

आठ दिवसांपूर्वी हे कुटुंबीय तालुक्यात परतलेले होते त्यानंतर या अल्पवयीन मुलीला शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला आणि या प्रकारामागील आरोपी हा मुलीचा बापच असल्याचे समोर आले. बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चवळी उपनिरीक्षक खरात यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन मुलीची चौकशी केली त्यामध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love