लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या देशात समोर आलेला असून सीबीआयने ईशान्य रेल्वेचे गोरखपूर येथील वरिष्ठ अधिकारी के सी जोशी यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली आहे. जोशी यांनी एका कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितली आणि त्यांच्या कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची देखील धमकी दिलेली होती. सीबीआयने जोशी याच्या गोरखपुर आणि नोएडा येथील घरांवर देखील छापे टाकलेले असून तिथून सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केलेली आहे.
तक्रारदार व्यक्ती यांनी आरोप केलेला आहे की , ‘ जोशी यांनी त्यांच्याकडे सात लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच दिली नाही तर कंपनीची सरकारी ही मार्केट प्लेसवरील पोर्टल नोंदणी रद्द करण्यात येईल तसेच नुकतेच मिळालेले करार देखील रद्द करण्यात येईल ‘, अशी धमकी दिली होती. के सी जोशी हे 1988च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्विसचे अधिकारी आहेत.
सीबीआयने सापळा रचला आणि त्यानंतर के सी जोशी यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. त्यांच्या दोन निवासस्थानावर छापे टाकून सुमारे अडीच कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली असून त्यांचे कॉम्प्युटर ताब्यात घेतलेले आहे. एक टीम अद्यापही गोरखपुर इथे तळ ठोकून असून सीबीआयने चौकशी दरम्यान के. सी जोशी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेली आहेत .