अवघ्या काही महिन्यात घरात फ्रिज टीव्ही कुलर , नवऱ्यानं देखील विचारलं नाही

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका विवाहित महिलेच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलत आणि तिला वेगवेगळी आमिषे दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 65 वर्षे वृद्ध व्यक्तीच्या विरोधात अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विष्णू संपाळे ( वय 65 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शहरातील रामदास पेठ भागात त्याने एक कंपनी कार्यालय थाटले आणि त्यामध्ये ही विवाहित महिला काम करत होती. कार्यालयात कोणी नसल्याचे पाहून आरोपी व्यक्ती तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा. ‘ माझे माझ्या पत्नीसोबत पटत नाही. तिच्याकडून मला कुठलेही शारीरिक सुख मिळत नाही ‘ असे सांगत त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलेले होते.

विवाहित महिला हिचेदेखील पतीसोबत पटत नव्हते त्यामुळे त्याच्या गोड गोड बोलण्याला ती फसली आणि आरोपी आर्थिकदृष्ट्या सदर असल्याकारणाने तिला वेगवेगळ्या स्वरूपाच्या भेटवस्तू द्यायचा आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आरोपीने या प्रकाराचा लॅपटॉपमध्ये गुपचूप तिला अंदाज नसताना व्हिडिओदेखील काढून ठेवला. अशा पद्धतीने काम केल्यावर काही दिवसातच त्याची कंपनी बुडाली आणि विवाहित महिलेला देखील नोकरी सोडावी लागली. आरोपीने तिला फ्रिज टीव्ही कुलर अशा देखील वस्तू देण्याची माहिती देण्याची माहिती समोर आलेली असून विशेष म्हणजे महिलेच्या पतीने देखील या वस्तू इतक्या कमी वेळात आपल्या घरात कशा आल्या ? याची चौकशी देखील पत्नीकडे केली नाही.

नोकरी सोडल्यानंतर देखील आरोपी तिला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. तिच्या घरी यायचा आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी द्यायचा. त्याच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित विवाहितेने 19 सप्टेंबर रोजी रामदास पेठ पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ 65 वर्षीय विष्णू संपाळे याला अटक केलेली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.


Spread the love