पुण्यामध्ये एक खळबळजनक अशी घटना पिंपरीत समोर आलेली असून आयटी कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारलेली असून त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर अखेर तिचा मृत्यू झालेला आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पूजा कुमारी ( वय 28 ) असे मयत शिक्षिकेचे नाव असून त्यांच्या वडिलांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रकाश कुमार ( राहणार भोईरवाडी माणगाव तालुका मुळशी ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून पूजा कुमारी ही एका खाजगी शाळेत शिक्षिका होती आणि तिचा पती प्रकाश कुमार हा आयटी कंपनीत कामाला होता.
पूजा कुमारी हिला नोकरी करण्याची इच्छा होती मात्र तरीदेखील आरोपी प्रकाश याने तिला याआधी नोकरी सोडण्यास भाग पाडले होते मात्र त्यानंतरही एका ठिकाणी पूजा कुमारी नोकरी करत असायची. प्रकाश तिला नोकरीच्या वेळेतच घरातील कामे करण्यास दबाव टाकायचा. घरातील कामातील व्यस्त ठेवून नोकरीला जाण्यास आरोपी हा सातत्याने तिची अडवणूक करायचा. सतत पतीकडून होत असलेल्या या त्रासाला वैतागून अखेर तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारली त्यात तिचा मृत्यू झालेला आहे , असे फिर्यादीत म्हटलेले आहे.