रात्री बाहेर झोपलेला असताना ऍसिड टाकून पळाला , वृद्धाचा मृत्यू

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना जालन्यात समोर आलेली असून जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीच्या अंगावर रात्री झोपेत ऍसिड टाकण्यात आले आणि त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर अखेर या व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , श्रीरंग हरीबा शेजुळ ( वय 85 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील ही घटना आहे . सदर प्रकरणी संशयित असलेला नंदू किशोर शेजुळ याच्या घरातून ॲसिड जप्त करण्यात आलेले असून त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे . श्रीरंग शेजुळ यांच्या मुलाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादी यांचे वडील श्रीरंग हरीबा शेजुळ हे अंगणात बाजेवर झोपलेले होते त्यावेळी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या अंगावर कसले तरी द्रव्य फेकून एक व्यक्ती पळून गेला. त्यांचे अंग भाजत असल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . उपचार सुरू असतानाच त्यांचा अखेर मृत्यू झालेला आहे आरोपीने आपण हा प्रकार जादूटोण्याच्या संशयातून केल्याची कबुली दिलेली आहे.


Spread the love