बायकोची प्रसूती पाहून ‘ मानसिक धक्का ‘ बसला , पतीची कोर्टात धाव

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एक अजब प्रकरण चर्चेत आलेले असून महिलांना प्रसूती होताना जो काही त्रास होतो त्याची जाणीव पतीला व्हावी जेणेकरून जास्त मुले जन्माला घालण्याचा अट्टाहास पती करणार नाहीत या उद्देशाने पत्नीची डिलिव्हरी दाखवण्याचा प्रताप एका रुग्णालयाला चांगलाच महागात पडलेला आहे.

ऑस्ट्रेलिया येथील ही घटना असून सिडनीमध्ये पत्नीची प्रसुती लेबर रूममध्ये उपस्थित राहून पाहिल्यानंतर पतीला गंभीर मानसिक धक्का बसला आणि त्यातून त्याला मानसिक आजार जडलेला आहे . हॉस्पिटलवर तब्बल 75 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा या व्यक्तीने ठोकलेला असून घटना 2016 मध्ये घडलेली आहे.

जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियातील रोमन रॉयल वुमन्स हॉस्पिटलमध्ये एका महिलेची प्रसूती झालेली होती. तिला मुलगा देखील झाला त्यावेळी रुग्णालयाने पतीला रुग्णालयात उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. घटनेला पाच वर्षे उलटून गेले त्यानंतर ही घटना पाहिल्यानंतर आपल्याला मानसिक धक्का बसलेला आहे म्हणून रुग्णालयाने आपल्याला भरपाई द्यावी असे सांगितले आहे मात्र न्यायालयाने या पतीची बाजू ऐकून घेण्यास देखील नकार दिलेला आहे.


Spread the love