‘ पप्पा तुम्ही गेले की काका येतात अन मम्मीसोबत खोलीत..’ , अखेर रंगेहाथ धरलं

Spread the love

देशात एक अनैतिक संबंधाचे एक अजब प्रकरण सध्या समोर आलेले असून उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. आपला पती बाहेर जाताच प्रियकराला घरात बोलावून त्याच्यासोबत रासलीला रचवणाऱ्या या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पतीने रंगेहात पकडलेले असून आरोपी प्रियकराला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे. तक्रारदार व्यक्ती हे डॉक्टर असून त्यांच्या लहान लेकीमुळे हा प्रकार समोर आलेला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विवाहबाह्य संबंध ठेवणारी महिला ही पेशाने शिक्षिका असून तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा पंधरा वर्षाचा असून धाकटी लेक सहा वर्षांची आहे. महिलेचा पती डॉक्टर असून फतेहपुर रुग्णालयात काम करतो. पती आणि मुलगा घरी नसल्यानंतर ही महिला तिच्या प्रियकराला घरी बोलवायची. महिलेचा प्रियकर हा प्रॉपर्टी डीलर असून गेल्या अनेक महिन्यांपासून तिचे त्याच्यासोबत अनैतिक संबंध सुरू होते.

आपली मुलगी लहान आहे तिला काही समजत नाही या भावनेतून तिच्यासमोरच त्यांचे अश्लील चाळे सुरू असायचे. मुलीला ही गोष्ट लक्षात आली आणि तिने वडिलांना , ‘ तुम्ही नसताना एक काका घरी येतात तिथे आईला घेऊन एका खोलीत जातात त्यानंतर दरवाजा लावून घेतात. एकदा त्या काकांनी माझ्या गालावरही किस केले होते आणि कुणाला काही सांगितले तर मारून टाकील , अशी देखील त्यांनी धमकी दिली ‘ असे मुलीने वडिलांना सांगितले.

आपल्याला लहान मुलीकडून या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर डॉक्टर असलेल्या या पतीने त्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन केला. नेहमीप्रमाणे बुधवारी घरातून ते बाहेर पडले मात्र अर्ध्या वाटेतून परत आले त्यावेळी त्यांची पत्नी ही तिच्या प्रियकरासोबत एका खोलीमध्ये होती त्यानंतर पतीने बाहेरून कडी लावून घेतली आणि पोलिसांना फोन केला. अवघ्या काही मिनिटात पोलीस तिथे आले आणि त्यानंतर या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले..


Spread the love