बायकोला माहेरी सोडलं अन टोकाचं पाऊल उचललं , आजीने पाहिलं तेव्हा..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या कोल्हापूरमध्ये समोर आलेले असून कागल तालुक्यातील अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाने बायकोला तिच्या माहेरी सोडले आणि त्यानंतर राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार , रोहित शंकर मोरे ( वय 26 ) असे मयत तरुणाचे नाव असून गवंडी काम करणारा रोहित याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेले होते. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले असून त्याचे आई माहेरी गणेशोत्सवासाठी गेलेली होती त्यानंतर रोहित याने पत्नीला देखील तिच्या माहेरी सोडले आणि घरी आजी सोबत राहत होता.

संध्याकाळी चारच्या सुमारास आजीने त्याला आवाज दिला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून आजी दुसऱ्या माळ्यावर आली त्यावेळी त्याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केलेली होती. तात्काळ पोलिसांना या प्रकरणी खबर देण्यात आली आणि कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे.


Spread the love