गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समोर येत असून असाच एक प्रकार पुन्हा एकदा फरासखाना पोलीस ठाणे अंतर्गत घडलेला आहे. हातगाडीवरून तरुणाला एका टोळक्याने मारहाण करण्यात करण्यास सुरुवात केली त्यानंतर घाबरलेला तरुण गणेशपेठ पोलीस चौकीत गेला मात्र त्याचा पाठलाग करत आलेल्या टोळक्याने दोन पोलिसांसमोरच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली.
उपलब्ध माहितीनुसार , फरासखाना पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार गंगाधर महादेव काळे ( वय पन्नास वर्षे ) यांनी तक्रार दिलेली असून राजेश शंकर परदेशी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . प्रताप परदेशी ( वय 38 ), युवराज किशोर परदेशी ( वय 29 ), शंकर परदेशी ( वय ५२ ), अशोक सुंदरलाल परदेशी आणि एका व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आलेली असून शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडलेली होती.
तक्रारदार व्यक्ती हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीला असून शनिवारी सकाळी गणेश पेठ पोलीस चौकीत कर्तव्यावर असताना विशाल कोटकर ( वय 29 ) नावाचा एक तरुण पोलीस चौकीत पळत आला आणि त्याच्या पाठोपाठ सहा जणांचे सराईत टोळके देखील पोलीस चौकीत घुसले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या समोरच मारहाण होत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला त्यावेळी या टोळक्याने पोलिसांची देखील कॉलर पकडली. पोलीस असल्याचा तुम्हाला माज आला आहे बघून घेतो , असे देखील धमकावले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.