महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून एका व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिली नाही तर व्यावसायिक तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून 21 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत हा प्रकार खेड तालुक्यातील शिरोली इथे घडलेला आहे. चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आकाश विनायक भुरे ( वय 22 राहणार नाणेकरवाडी तालुका खेड ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत शुभम सरोदे अजय यलोटे , सोहेल पठाण , पण्या गोसावी आणि एक साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व्यावसायिक असलेले संजय कुरुंदवाडे ( वय 55 राहणार चाकण ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
संजय हे गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आळंदी फाटा इथून चाकण येथील घरी जात असताना आरोपी रिक्षातून आले आणि रिक्षा आडवी लावत फिर्यादी यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल काढून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि शिरोली येथील एका शेतात आरोपी त्यांना घेऊन गेले.
संजय यांच्या म्हणण्यानुसार , ‘ आरोपींनी त्यांना तिथे तुझा मोठा व्यवसाय आहे. आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील तरच तुला जिवंत सोडू नाहीतर तुझे आणि तुझ्या घरच्यांची गेम करून टाकू ‘ असे म्हटले. फिर्यादी यांच्या पायावर शस्त्र ठेवले आणि त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली. फिर्यादी यांच्या बॅगमधून जबरदस्तीने 20000 रुपये काढून घेतले आणि दोन दिवसात कमीत कमी बारा लाख रुपये दे नाहीतर तुझ्या घरच्यांना संपवून टाकू , असे देखील आरोपींनी म्हटले असे म्हटले आहे त्यानंतर तक्रारदार यांना आरोपींनी सारा सिटी येथे टू व्हीलरवर आणून सोडले.