पुण्यात ‘ मायकार ‘ च्या सीईओकडून जवळीक करण्याचा प्रयत्न ? महिला म्हणतेय की..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एका महिलेसोबत लगट करून तिचा कथित विनयभंग केल्याचा प्रकार पिंपरीतील माय कार शोरूममध्ये समोर आलेला असून कंपनीच्या सीईओच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे 25 एप्रिलपासून 24 ऑगस्टपर्यंत वाकड येथील भुमकर चौकाजवळ हा प्रकार घडला होता.

तक्रारदार महिलेचे वय 27 वर्ष असून हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यानंतर माय कार कंपनीचे सीईओ अमृतगौडा पाटील ( वय 48 राहणार आदर्श नगर किवळे ) यांच्यासोबत इतर दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार महिला वाकड येथील माय कार शोरूममध्ये काम करत होत्या त्यावेळी पाटील यांनी आपल्यासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी म्हटलेले आहे .


Spread the love