देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील सीतापुर इथे समोर आलेले असून पोलिसांनी एका तृतीयपंथीय व्यक्तीवर मोठी कारवाई केलेली आहे. तृतीयपंथी आरोपींची दोन कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेण्यात आलेली असून जेलमध्ये असलेल्या एका तृतीयपंथीय व्यक्तीने एका मुलाला फसवून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्यानंतर त्याला भीक मागायला लावली असा त्याच्यावर आरोप आहे. सीतापुर पोलिसांनी आरोपीच्या चार गाड्या आणि तीन घरे जप्त केलेले आहेत आणि अद्यापही या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी तृतीयपंथी व्यक्ती याने त्याची स्वतःची गॅंग तयार केलेली असून ही गॅंग मुलांचे अपहरण करून त्यांना गायब करायची आणि त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापायची आणि तो नपुसक झाला की त्याला भीक मागायला लावयाची. गेल्या वर्षी हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलेले होते त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता तपासली आणि त्यानंतर आरोपी तृतीयपंथी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याची चौकशी सुरू आहे.
काजल असे या तृतीयपंथीय व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याची तीन घरे आणि चार गाड्यासोबतच लाखो रुपये जप्त केलेले आहेत. आरोपी तृतीयपंथी व्यक्तीने ही संपत्ती कशी कमवली याचा देखील सध्या शोध सुरू असून प्राथमिक माहितीनुसार काजल याने स्वतःचे टोळके बनवलेले होते आणि लहान मुलांचे अपहरण करून त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापून हे टोळके त्यांना भीक मागायला लावायचे.
आरोपी काजल या तृतीयपंथीय व्यक्तीच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले असून अद्यापपर्यंत त्यावर कुठलीही मोठ्या स्वरूपाची कारवाई झाली नाही म्हणून हे टोळके सोकावलेले असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. आरोपीने संपत्ती कुठल्या पद्धतीने कमावली याचा देखील सध्या पोलीस तपास करत आहेत.