तब्बल अडीच तास पतीसमोरच सामूहिक अत्याचार , अटक कुणालाच नाही

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना हरियाणाच्या पानिपत इथे समोर आलेली असून तीन महिलांवर चार जणांनी मिळून सामूहिकरित्या बलात्कार केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी महिलांच्या कुटुंबीयांच्या समोर हा प्रकार केलेला असून पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत ही घटना घडलेली आहे. बुधवारी ही घटना घडलेली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे मात्र अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार , बुधवारी रात्रीची ही घटना असून आरोपी हे घरात चाकू आणि धारदार शस्त्र घेऊन आणले होते. पीडित कुटुंब वास्तव्य करत असलेल्या घरांमध्ये चारही आरोपी घुसले आणि त्यांनी महिलांवर बलात्कार करण्याआधी घरातील सर्व सदस्यांचे पाय दोरीने बांधले आणि लहान मुलांच्या देखील तोंडाला चिकटपट्टी बांधलेली होती.

आरोपींनी त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने लुटून घेऊन जाताना आरोपींनी ज्या घरात सामूहिक बलात्कार केला त्या ठिकाणापासून एक किलोमीटर असलेल्या एका आजारी महिलेवर देखील हल्ला केला त्यात या महिलेचा देखील मृत्यू झालेला आहे. रात्री एकच्या सुमारास चार जण घरात घुसले आणि त्यांनी महिलांवर बलात्कार केला.

पीडित महिलांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास अडीच तास आरोपी वेळोवेळी त्यांच्यावर बलात्कार करत होते. सर्व कुटुंबाला यावेळी बंधक बनवून ठेवण्यात आले होते. आरोपी निघून गेल्यानंतर पीडित महिलांनी कसाबसा आरडा पीडीत महिलांनी आरडाओरडा सुरू केला त्यानंतर ग्रामस्थ तिथे पोहोचले आणि त्यांची सुटका कुटुंबीयांची सुटका केली


Spread the love