विवाहित प्रेयसीच्या घरी गेला अन ‘ प्रायव्हेट पार्ट ‘ गमावला , तिची मैत्रीणही होती अन..

Spread the love

प्रियकर प्रेयसी म्हटल्यानंतर अनेकदा एकमेकांवर हक्क गाजवण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यातून गुन्हेगारी घटना देखील घडतात असाच एक प्रकार सध्या उत्तर प्रदेशात समोर आलेला असून कानपूर येथील घटनेत एका व्यक्तीने प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे त्या मैत्रिणीचा अहंकार दुखावला आणि तिने मैत्रिणीच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून तो कापून टाकला

उपलब्ध माहितीनुसार , कानपूरच्या चौबेपूर गावात ही घटना घडलेली असून गावातील एका तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. विवाहित महिलेच्या घरी तिची मैत्रीण आलेली होती त्यावेळी तिने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले आणि मैत्रिणीसोबत त्याची ओळख करून दिली. विवाहितेची मैत्रीण हिनेदेखील या बॉयफ्रेंडसोबत लगट करायला सुरू केले आणि शारीरिक संबंधासाठी ती त्याला जबरदस्ती करू लागली.

प्रियकराने त्यानंतर ‘ माझे तुझ्या मैत्रिणीसोबत संबंध आहेत तुझ्यासोबत नाही ‘ असे तिला ठणकावले मात्र तिला याचा राग आला आणि त्याने तिने संतापाच्या भरात चाकू काढून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार केला त्यामध्ये त्याचा प्रायव्हेट पार्ट तुटला . तरुण जोरजोरात किंचाळू लागला आणि त्याने तेथून पलायन केले आणि घर गाठले

घरी पोहोचल्यानंतर हा तरुण रक्तबंबाळ झालेला होता आणि घाबरून गेल्यानंतर कुटुंबीयांना देखील एकच धक्का बसला आणि त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून आरोपी महिला आणि त्याची प्रेयसी दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


Spread the love