सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून देवासाठी म्हणून एका बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्याचे मटण खाताना बकऱ्याचा डोळा ज्या व्यक्तीने बळी दिला त्याच्याच घशात अडकला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील सुरजपुरला लागून पररी नावाच्या गावातील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रामानुजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणारा पन्नास वर्षीय बगर साई हा काही मित्रांसह प्रसिद्ध असलेल्या खोपा धाम इथे पोहोचलेला होता. आपला नवस पूर्ण झाला म्हणून त्याने एक बकरा आणला आणि त्याचा बळी देण्यासाठी पूजा केली आणि या बकऱ्याचा बळी दिला.
आपला नवस पूर्ण झाला म्हणून त्याने बकऱ्याचा बळी दिला मात्र सर्वांनी त्यानंतर बकऱ्याचे मांस शिजवले आणि हे मांस खात असतानाच बगर याला घशात त्रास होऊ लागला. बकऱ्याचा डोळा त्याच्या घशात अडकला आणि त्याला ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात नेले मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. या विचित्र घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे .