मुलीच्या हातावर ‘ चोर ‘ लिहून शाळेत फेऱ्या मारायला लावल्या , त्यानंतर मात्र..

Spread the love

शाळेत अभ्यास केला नाही किंवा कमी मार्क पडले म्हणून अनेकदा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा भर वर्गात अपमान करण्यात येतो मात्र असाच एक अपमान जिव्हारी लागल्यानंतर एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पंजाबमधील लुधियाना येथील एका खाजगी शाळेतील ही घटना असून तिच्या कपाळावर आणि हातावर चोर लिहिले होते आणि तिला परिसरात फेरी मारायला फेऱ्या मारायला लावलेले होते त्यामुळे तिने हा प्रकार केला . तिचा पाठीचा कणा तुटलेला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत जर कुणाला काही सांगितले तर मुलीवर उपचार देखील आम्ही करणार नाहीत अशी धमकी कुटुंबीयांना दिली. त्या भीतीने शाळा कुटुंबीयांनी देखील ही माहिती कुणालाच दिलेली नव्हती मात्र काँग्रेस नेते सुशील कपूर लकी आणि गुरुजीत सिंग यांना याप्रकरणी माहिती मिळाली आणि त्यांनी शाळेच्या बाहेरच धरणे आंदोलन केले. कुटुंबीयांनी अद्यापपर्यंत देखील पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही. तक्रार आल्यानंतर कारवाई करू असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.

पीडित मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिकत असून ती तिची वही घरी विसरली होती. शिक्षकेने तिला वही आणण्यासाठी पाठवले. एका विद्यार्थिनीने तिच्या बॅगमध्ये एक वही ठेवली आणि त्यानंतर तिच्यावर चोरीचा आळ घेतला. विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांकडे देखील नेण्यात आले त्यावेळी तिच्या बॅगेत वही सापडली मात्र मुख्याध्यापकांनी कुठलीही दयामाया न करता तिच्या कपाळावर आणि हातावर चोर लिहून शाळेच्या आवारात तिला फेरी मारायला लावली त्यामुळे ती व्यथित झाली आणि तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली त्यात तिचा पाठीचा कणा तुटलेला आहे.


Spread the love