लग्नाला नऊ महिने होऊनही नवरा ‘ स्पर्श ‘ करेना , विवाहितेची पोलिसांकडे न्यायाची मागणी

Spread the love

bride

देशात सध्या एक अजब प्रकरण सध्या समोर आलेले असून उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाला नऊ महिने उलटून गेले मात्र पतीने अद्यापही अंगाला स्पर्श केला नाही असे म्हणत एक विवाहित महिला पोलीस ठाण्यात पोहोचलेली होती. आपला पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही तरी देखील आपले फसवून लग्न लावून देण्यात आलेले असून पोलिसांनी आपल्याला न्याय द्यावा , असे तिने म्हटलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , परतापुर येथील हे प्रकरण असून तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 2022 मध्ये वाजत गाजत लग्न करण्यात आले. लग्नासाठी आपल्या वडिलांनी 26 लाख रुपये खर्च केले. आपला पती एका आयटी कंपनीत एचआर इंजिनिअर असून लग्नाला एक वर्ष होत आले तरी देखील पतीने अद्यापपर्यंत आपल्या अंगाला हात लावलेला नाही. लग्नानंतर काही दिवसांनी त्याच्यासोबत दिल्लीला राहायला गेलो मात्र तिथे देखील आपल्याला त्याचा असाच अनुभव आला.

महिलेने पुढे म्हटले की , आपण स्वतःहून अनेकदा पुढाकार घेत त्याला लैंगिक संबंधासाठी विचारले त्यावेळी त्याने आपण यासाठी अजून सक्षम नाहीत असे सांगितले आणि त्यानंतर चिडून आपले डोके लोखंडी रेलिंगवर आपटून आपल्याला जिवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. दिल्लीत फ्लॅट घेण्यासाठी माहेरवून पैसे घेऊन ये असा देखील दबाव तो आपल्यावर टाकत आहे ‘, असेही महिलेचे म्हणणे आहे.

हतबल झालेल्या महिलेने पती-सासरे आणि सासूच्या विरोधात तक्रार केली असून लग्नासाठी आपल्याला फसवण्यात आलेले आहे असे म्हटलेले आहे. सासरच्या व्यक्ती आता आपल्या मुलावर आपण उपचार करून घेऊ असे सांगत आहेत असे देखील म्हटलेले आहे. पोलिसांनी आपल्याला न्याय द्यावा अशी या महिलेची मागणी आहे .


Spread the love