एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेले असून चार महिन्यांपूर्वी दाजीच्या घरात झालेल्या चोरीत याप्रकरणी अखेर साल्यालाच अटक करण्यात आलेली आहे. साथीदाराच्या मदतीने त्याने ही चोरी केलेली होती आणि 39 लाख रुपयांचा ऐवज जप्त केलेला होता त्यापैकी 36 लाख रुपये आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने अखेर न्यायालयाच्या आदेशाने दाजीला परत करण्यात आलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , बघतसिंह हरी सिंह ( वय 42 राहणार सिडको वाळूज ) हे एका कंपनीसाठी वसुलीचे काम करतात. त्यांचा मेव्हणा अर्थात बायकोचा भाऊ साला हा दशरथ सिंह क्रांतिसिंह ( वय 25 राहणार राजस्थान ) हा त्यांच्या घरी आलेला होता आणि त्याने चाळीस लाख रुपयांची बॅग घेऊन पलयन केलेले होते. पोलिसात प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशात जाऊन अटक केली.
पोलीस तपासात दशरथसिंह याने प्रदीप कुमार जगदीश जोशी नावाच्या एका व्यक्तीच्या मदतीने हा प्रकार केल्याची कबुली दिलेली होती त्यानंतर पोलीस पथकाने प्रदीप कुमार जोशी याला देखील ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एकूण 36 लाख रुपये जप्त केले. उरलेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिने , सोन्याच्या चैन आणि मोबाईल खरेदी केलेले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर चोरीला गेलेला माल तक्रारदार व्यक्ती यांना परत करण्यात आलेला आहे. पोलिसांमुळे चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने बघतसिंह यांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत. पोलीस आयुक्त मनोज लोहिया , उपायुक्त नितीन बगाटे , सहाय्यक आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव , दुय्यम निरीक्षक गणेश ताठे , सहाय्यक फौजदार कडू , पोलीस कॉन्स्टेबल राजाभाऊ कोल्हे यांनी तपासकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.