महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना नाशिक रोड परिसरात घडलेली असून कॅनॉल रोड भागात एका वासनांध बापाने अवघ्या पावणे सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. सदर प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने धाव घेत पतीच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कॅनॉल रोड भागात राहणारी फिर्यादी महिला आणि संशयित असलेला आरोपी हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला असून आठवड्यापूर्वी फिर्यादी महिलेच्या पावणे सहा वर्षाच्या मुलीने आपल्याला लघवी करताना त्रास होत आहे असे सांगितले होते त्यानंतर आई मुलीला डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेली त्यावेळी डॉक्टरांनी तिला स्त्रीरोगतज्ञकडे जाण्याचा सल्ला दिला.
महिलेने मुलीला घरी आणले आणि त्यानंतर विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली त्यावेळी तिने आपल्या सोबत घडलेला हा संतापजनक प्रकार आईला कथन केला. उपनगर पोलीस ठाणे गाठत त्यानंतर संशयित बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बायको कामावर गेल्यानंतर आरोपी हा मुलीला खाऊचे आमिष दाखवायचा आणि त्यानंतर तिच्यासोबत हा प्रकार करत होता. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे.