पोलीस अंमलदाराचे टोकाचे पाऊल , सकाळी लक्षात आले तोपर्यंत..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक आणि दुर्दैवी अशी घटना सांगलीत समोर आलेली असून शहर पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून काम करणारे वसीम मुसा आत्तार ( वय 42 राहणार मुजावर प्लॉट बस स्थानक परिसर सांगली ) यांनी सोमवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार , वसीम हे मिरज येथील महात्मा गांधी पोलीस चौकीत कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी त्यांची सांगली शहर पोलीस ठाण्यात बदली झालेली होती. रविवारी ड्युटीवरून ते नेहमीप्रमाणे घरी आले आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. पोलीस वर्तुळात या बातमीने खळबळ उडालेली आहे.


Spread the love