महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना सांगलीत समोर आलेली असून पंधरा दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील अंकली फाट्यावर नाकाबंदी करत असताना एका कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक यांचे अखेर उपचार सुरू असतानाच निधन झालेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रामराव गोविंदराव पाटील ( वय 55 राहणार डोंगरसोली तालुका तासगाव जिल्हा सांगली ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांच्या निधनानंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते पोलीस दलात तसेच मित्र परिवारात लोकप्रिय होते.
सांगलीतील मिरज तालुक्यातील अंकली इथे पंधरा दिवसांपूर्वी नाकाबंदी करत असताना एका कारने त्यांना जोरदार धडक दिलेली होती. त्या धडकेत ते गंभीर जखमी झालेले होते. भरधाव वेगाने आलेल्या कारला त्यांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र चौकातील वळण लक्षात आले नाही म्हणून या कारने पाटील यांनाच जोरदार धडक दिलेली होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालेला असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत .