अखेर ‘ त्या ‘ विवाहितेचे टोकाचे पाऊल , लग्नाला तेरा वर्षे झाली अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतर देखील मुलगा होत नसल्याने सासरच्या व्यक्तींनी विवाहितेचा छळ सुरू केला आणि अखेर या छळाला कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात रविवारी रात्री 24 सप्टेंबर दरम्यान रोजी ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अस्मिता केदारी चौगुले ( वय तीस वर्ष राहणार कोथळी तालुका करवीर ) असे मयत विवाहित महिलेचे नाव असून महिलेच्या वडिलांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. महिलेचा पती सासू-सासरे यांच्यावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीनही जणांना पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे

सुमारे 13 वर्षांपूर्वी अस्मिता आणि केदारी यांचा विवाह झालेला होता. लग्नानंतर अस्मिता यांनी दोन मुलींना जन्म दिला त्यानंतर अस्मिताचा पती आणि सासरचे व्यक्ती यांनी आता आपल्याला वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलासाठी त्यांचा छळ सुरू केलेला होता.

कित्येक वर्षांपासून त्यांचा छळ अस्मिता सहन करत होत्या मात्र अखेर सहन करण्यापलीकडे परिस्थिती गेली आणि त्यानंतर त्यांनी कोथळी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या माहेरच्या व्यक्तींना या संदर्भात माहिती समजताच त्यांनी कोथळी गावात धाव घेतली आणि जोपर्यंत सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका घेतली. पोलिसांनी त्यानंतर गुन्हा दाखल करून सासू-सासर्‍यांना अटक केलेली असून घडलेल्या घटनेबद्दल परिसरात शोकाकुल वातावरण आहे.


Spread the love